🔥 2027 Admissions Open | Navodaya • Sainik School • RMS • Scholarship | Join Now apply coupon code 500 OFFLearn more →
Skip to content
सैनिक स्कूल (Sainik School) प्रवेश परीक्षा: फी, प्रवेश प्रक्रिया, दिनचर्या आणि संपूर्ण सत्य!
Back to Blog
SAINIK SCHOOL3 min read

सैनिक स्कूल (Sainik School) प्रवेश परीक्षा: फी, प्रवेश प्रक्रिया, दिनचर्या आणि संपूर्ण सत्य!

M

MAYUR KASTURE SIR

7 September 2026

१. सैनिक स्कूलमधील कॅडेटची रोजची कडक दिनचर्या (Routine)

सैनिक स्कूलमधील जीवन हे लष्करी शिस्तीवर आधारित असते. एका सामान्य कॅडेटचा दिवस खालीलप्रमाणे असतो:

  • सकाळी ५:०० ते ५:३५: ५:०० वाजता वेक-अप कॉल, ५:३५ वाजता पीटी (PT), ड्रिल आणि थंडीतही स्विमिंग.

  • सकाळी ८:३० ते दुपारी १:३०: तब्बल ५ तास सतत शैक्षणिक वर्ग (Academics).

  • संध्याकाळी ४:०० ते ६:००: क्रीडा प्रकार (Games), ऑबस्टॅकल कोर्स आणि स्विमिंग.

  • रात्री: प्रेप क्लासेस (Prep Classes), रात्रीचे जेवण, स्व-अभ्यास आणि रात्री १०:०० वाजता लाईट्स ऑफ (Lights Off).

  • मनोरंजन व विश्रांती: शनिवारी लहान मुलांसाठी आणि रविवारी मोठ्या मुलांसाठी चित्रपट (Movie) दाखवला जातो.


२. सैनिक स्कूल म्हणजे काय? (What is Sainik School?)

  • सैनिक स्कूल या भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाद्वारे (Ministry of Defence) चालवल्या जाणाऱ्या निवासी (Boarding) शाळा आहेत.

  • मुख्य उद्देश: विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करणे, शिस्त, वक्तशीरपणा, नेतृत्वगुण आणि शारीरिक तंदुरुस्ती रुजवून NDA (National Defence Academy) द्वारे सैन्यात अधिकारी बनवणे.

  • सैन्याव्यतिरिक्त येथील मुले भविष्यात सिव्हिल सर्व्हिसेस, इंजिनिअरिंग, मेडिकल अशा विविध क्षेत्रांतही यश मिळवतात.


३. प्रवेश परीक्षा आणि पात्रता (Eligibility & Admission)

  • परीक्षेचे नाव: ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम (AISSEE). ही परीक्षा वर्षातून एकदा (साधारण जानेवारी महिन्यात) होते.

  • इयत्ता ६ वी प्रवेश पात्रता: वय १० ते १२ वर्षे असावे (विद्यार्थ्याला ३ री, ४ थी किंवा ५ वी, ६ वी मध्ये असताना २ वेळा संधी मिळते).

  • इयत्ता ९ वी प्रवेश पात्रता: वय १३ ते १५ वर्षे असावे (विद्यार्थ्याला ७ वी, ८ वी किंवा ८ वी, ९ वी मध्ये असताना २ वेळा संधी मिळते).

  • मुलींना प्रवेश: पूर्वी सैनिक स्कूल फक्त मुलांसाठी होते, आता मुलींनाही प्रवेश दिला जातो.


४. परीक्षेचा पॅटर्न व गुणविभागणी (Exam Pattern)

  • इयत्ता ६ वी साठी (३०० गुण):

    • विषय: गणित, भाषा, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान (GK).

    • माध्यम: इंग्रजी किंवा प्रादेशिक भाषा (मराठी).

  • इयत्ता ९ वी साठी (४०० गुण):

    • विषय: गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्र.

    • माध्यम: इंग्रजी किंवा हिंदी.

  • निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा गुणवत्ता यादी (Merit List) वैद्यकीय तपासणी (Medical Test) अंतिम प्रवेश.


५. जागांचे आरक्षण (Reservation Criteria)

  • ६७% जागा: होम स्टेट (शाळा ज्या राज्यात आहे त्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी).

  • ३३% जागा: इतर राज्यांतील (Other State) विद्यार्थ्यांसाठी.

  • वर्गनिहाय आरक्षण: OBC (२७%), SC (१५%), ST (७.५%), आणि डिफेन्स पर्सनल (२५%).


६. पायाभूत सुविधा (Infrastructure & Facilities)

  • बास्केटबॉल, बॉक्सिंग रिंग, बॅडमिंटन कोर्टसह भव्य इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स.

  • स्विमिंग आणि डायव्हिंग प्लॅटफॉर्मसह स्वतंत्र स्विमिंग पूल.

  • सांस्कृतिक कार्यक्रम व वक्तृत्व स्पर्धांसाठी अत्याधुनिक ऑडिटोरियम.

  • वैद्यकीय सुविधा: ऑर्थोपेडिक, नेत्रतज्ञ, बालरोगतज्ञ, त्वचा रोगतज्ञ व नियमित वैद्यकीय तपासणी शिबिरे.


७. NCC, NDA आणि SSB ची विशेष तयारी

  • NCC ट्रेनिंग: ८ वी - ९ वी च्या विद्यार्थ्यांना 'A' सर्टिफिकेट आणि ११ वी - १२ वी च्या विद्यार्थ्यांना 'B' सर्टिफिकेट मिळते.

  • NDA & SSB प्रिपरेशन: एनडीए केंद्रित विशेष वर्ग, 'NDASF' सुविधा आणि माजी लष्करी अधिकारी व तज्ज्ञांची व्याख्याने.

  • १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी SSB च्या फिजिकल टास्कशी मिळतीजुळती ऑबस्टॅकल प्रॅक्टिस घेतली जाते.


८. सैनिक स्कूलची फी आणि शिष्यवृत्ती (Fee Structure & Scholarship)

  • सैनिक स्कूल ही सरकारी अनुदानित शाळा असली तरी तिची वार्षिक फी सुमारे ₹२ लाख किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते (यात निवास, भोजन, युनिफॉर्म, शिक्षण व ट्रेनिंग समाविष्ट असते).

  • SC, ST आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) घटकांतील विद्यार्थ्यांसाठी सरकारी स्कॉलरशिप उपलब्ध असते.

  • अचूक फीची माहिती संबंधित सैनिक स्कूलच्या अधिकृत वेबसाईटवर तपासावी.


९. महाराष्ट्रातील आणि देशातील सैनिक स्कूल संख्या

  • सरकारी सैनिक स्कूल: देशभरात एकूण ३३ सरकारी सैनिक स्कूल आहेत.

  • महाराष्ट्रातील सरकारी सैनिक स्कूल:

    1. सैनिक स्कूल, सातारा (स्थापना: १९६१ - देशातील पहिले सैनिक स्कूल).

    2. सैनिक स्कूल, चंद्रपूर (देशातील सर्वाधिक सुविधा असणारे सर्वात मोठे सैनिक स्कूल).

  • PPP मॉडेल (नवीन सैनिक स्कूल): केंद्र सरकारच्या १०० नवीन सैनिक स्कूल योजनेअंतर्गत महाराष्ट्रात १५ पेक्षा जास्त नवीन सैनिक स्कूल सुरू झाले आहेत.


१०. सकारात्मक बाजू आणि मर्यादा / आव्हाने (Pros & Cons)

  • सकारात्मक बाजू: कडक शिस्त, नेतृत्वगुण, उत्तम क्रीडा व अभ्यासाचे वातावरण, एनडीएची पूर्वतयारी.

  • मर्यादा व आव्हाने:

    • कडक दिनचर्या सर्वच मुलांच्या स्वभावाला जुळेलच असे नाही.

    • लहाना वयात घरापासून दूर राहणे काही मुलांना कठीण जाऊ शकते.

    • प्रवेशासाठी प्रचंड स्पर्धा असल्यामुळे मानसिक ताण येऊ शकतो.

    • ज्यांना सैन्यात करिअर करायचे नाही, त्यांच्यासाठी हे वातावरण उपयुक्त वाटणार नाही.


११. मार्गदर्शन व ऑनलाईन क्लासेस

  • सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी MSK Class द्वारे झूम (Zoom) व ॲपवरून ऑनलाईन लाईव्ह क्लासेस व बॅचेस उपलब्ध आहेत.

#SAINIK SCHOOL- SAINIK SCHOOL EXAM
Report this website