Get in Touch
Have questions? Fill out the form below and our team will help you.
Send Us a Message
Tell us what you need and we'll get back to you.
Frequently Asked Questions
प्रवेश प्रक्रिया काय आहे?
विद्यार्थ्यांनी MSK Classes App डाउनलोड करून ऑनलाइन नोंदणी करावी. त्यानंतर आपल्या आवडीची बॅच/कोर्स निवडून ऑफरनुसार फी भरावी. पेमेंटनंतर विद्यार्थ्यांना संबंधित कोर्सचा प्रवेश मिळेल आणि MSK App वरून क्लासेस, व्हिडिओ, नोट्स व टेस्टचा अभ्यास सुरू करता येईल.
Zoom Live Personal Batch साठी प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना Live Class ची वेळ व आवश्यक सूचना WhatsApp ग्रुपद्वारे दिल्या जातील.
फी हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा आहे का?
सध्या MSK Classes मध्ये कोर्सनुसार फी भरण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. उपलब्ध बॅच आणि कोर्सनुसार एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये फी भरण्याची सुविधा असल्यास त्याची माहिती Admission च्या वेळी दिली जाईल.
तुमच्या मुलासाठी योग्य बॅच आणि फीच्या पर्यायासाठी आमच्याशी संपर्क साधा.
फी परतावा (Refund Policy) काय आहे?
MSK App मधून घेतलेल्या Recorded Course / App Course साठी फी परतावा (Refund) उपलब्ध नाही.
पेमेंटनंतर विद्यार्थ्याला कोर्सचा डिजिटल प्रवेश दिला जात असल्यामुळे एकदा Course खरेदी केल्यानंतर भरलेली फी परत केली जाणार नाही.
त्यामुळे प्रवेश घेण्यापूर्वी कोर्सची माहिती, अभ्यासक्रम, बॅचची माहिती आणि उपलब्ध सुविधांची खात्री करूनच प्रवेश घ्यावा.
ऑनलाइन क्लासेसची सुविधा आहे का?
होय! MSK Classes मध्ये ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना MSK Classes App द्वारे Recorded Video Lectures, PDF Notes, सराव प्रश्नपत्रिका आणि Mock Tests उपलब्ध करून दिले जातात.
तसेच विद्यार्थ्यांसाठी Zoom Live Personal Batch ची सुविधाही उपलब्ध आहे, ज्यामध्ये शिक्षकांकडून थेट मार्गदर्शन आणि शंकानिरसन केले जाते.
हॉस्टेलची सुविधा उपलब्ध आहे का?
नाही. MSK Classes मध्ये सध्या कोणतीही Offline Class किंवा Hostel सुविधा उपलब्ध नाही.
आमचे सर्व वर्ग पूर्णपणे Online आहेत. विद्यार्थी MSK Classes App आणि Zoom Live Classes द्वारे घरबसल्या अभ्यास करू शकतात.
घरबसल्या दर्जेदार मार्गदर्शनासह नवोदय, सैनिक स्कूल, RMS आणि शिष्यवृत्ती परीक्षांची तयारी करा.
मोफत Demo Class ला उपस्थित राहता येईल का?
होय! MSK Classes मध्ये विद्यार्थ्यांना Demo Class ची सुविधा उपलब्ध आहे. प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थी Demo Class पाहून आमच्या शिकवण्याची पद्धत, अभ्यासक्रम आणि मार्गदर्शनाची गुणवत्ता समजून घेऊ शकतात.
Demo Class साठी आजच संपर्क करा आणि तुमच्या मुलाच्या तयारीची योग्य सुरुवात करा.
MSK Classes मध्ये कोणत्या परीक्षांची तयारी करून घेतली जाते?
MSK Classes मध्ये नवोदय विद्यालय, सैनिक स्कूल, RMS आणि विविध शिष्यवृत्ती परीक्षांची तयारी करून घेतली जाते.
नवोदय/सैनिक स्कूल/RMS परीक्षेसाठी फक्त Recorded Course पुरेसा आहे का?
Recorded Course विद्यार्थ्यांना स्वतःच्या वेळेनुसार अभ्यास करण्याची सुविधा देतो. अधिक नियमित मार्गदर्शनासाठी उपलब्ध असल्यास Zoom Live Batch निवडता येते.