🔥 2027 Admissions Open | Navodaya • Sainik School • RMS • Scholarship | Join Now apply coupon code 500 OFFLearn more →
Skip to content
इयत्ता 4 थी स्कॉलरशिप 2027 संपूर्ण माहिती फॉर्म अभ्यासक्रम कट ऑफ
Back to Blog
Exam Updates3 min read

इयत्ता 4 थी स्कॉलरशिप 2027 संपूर्ण माहिती फॉर्म अभ्यासक्रम कट ऑफ

M

Mayur Kasture sir

9 September 2026

. प्रस्तावना व परीक्षेचे महत्त्व

महाराष्ट्र शासनामार्फत आयोजित केली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा (स्कॉलरशिप एक्झाम) ही ग्रामीण व शहरी भागातील हुशार विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची स्पर्धा परीक्षा आहे. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि भविष्यात नवोदय, सैनिक स्कूल, MPSC, UPSC यांसारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची पायाभरणी लहान वयातच होते.

या परीक्षेमध्ये सिलेक्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळते, तसेच शाळेचा व शिक्षकांचाही गौरव होतो.


२. शिष्यवृत्तीची रक्कम (Scholarship Amount)

स्कॉलरशिप परीक्षेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे आर्थिक मदत मिळते:

  • इयत्ता ४ थी मधील विद्यार्थी: ₹५०० प्रति महिना (एकूण ३ वर्षांसाठी).

  • इयत्ता ७ वी मधील विद्यार्थी: ₹६५० प्रति महिना (एकूण ३ वर्षांसाठी).


३. पात्र शाळा व बोर्ड (Eligibility)

  • महाराष्ट्र राज्यातील मराठी माध्यम, सेमी-इंग्रजी, इंग्रजी माध्यम तसेच CBSE आणि ICSE बोर्डाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येते.

  • CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. (त्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळत नाही, परंतु सन्मान व गुणवत्ता यादीत स्थान मिळते).


४. अर्ज प्रक्रिया (Form Filling Process)

  • अर्ज कसा करावा? पालकांनी ऑनलाइन चौकशी बाहेर न करता आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा.

  • शाळेची भूमिका: प्रथम शाळा स्वतःचे नोंदणी (Registration) करते. त्यानंतर ९०% शाळाच विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेतात.

  • अर्जाची फी: सर्वसाधारण प्रवर्गासाठी अर्ज फी सुमारे ₹२०० असते (राखीव प्रवर्गासाठी फीमध्ये सवलत असते). ही फी शाळेतच जमा करावी लागते.


५. परीक्षेचे स्वरूप व गुणविभागणी (Exam Pattern - 300 Marks)

इयत्ता ४ थी व ७ वी दोन्हीसाठी परीक्षेचे स्वरूप एकूण ३०० गुणांचे असते. दोन्ही पेपर एकाच दिवशी होतात.

पेपर १ (सकाळचे सत्र - ११:०० ते १२:३०)

  • प्रथम भाषा (मराठी/इंग्रजी): २५ प्रश्न (५० गुण)

  • गणित: ५० प्रश्न (१०० गुण)

  • एकूण: ७५ प्रश्न | १५० गुण

पेपर २ (दुपारचे सत्र)

  • तृतीय भाषा (इंग्रजी): २५ प्रश्न (५० गुण)

  • बुद्धिमत्ता चाचणी: ५० प्रश्न (१०० गुण)

  • एकूण: ७५ प्रश्न | १५० गुण

  • प्रश्नांचा प्रकार: सर्व प्रश्न बहुपर्यायी (MCQ) असतात. प्रत्येक प्रश्नाला ४ पर्याय असतात व त्यांपैकी १ अचूक पर्याय निवडायचा असतो.

  • माध्यम: सेमी-इंग्रजीच्या विद्यार्थ्यांना गणित व बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका मूळ माध्यम व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असते.


६. वयोमर्यादा (Age Limit)

  • इयत्ता ४ थी साठी: विद्यार्थ्याचे वय १० वर्षांपेक्षा जास्त नसावे (दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी १४ वर्षांपर्यंत).

  • इयत्ता ७ वी साठी: विद्यार्थ्याचे वय १३ वर्षांपेक्षा जास्त नसावे (दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी १७ वर्षांपर्यंत). (टीप: वय जास्त असल्यास परीक्षेला बसता येते, परंतु शिष्यवृत्ती मिळत नाही.)


७. उत्तीर्णता (Passing Rules) आणि गुणवत्ता यादी (Merit List)

  • उत्तीर्ण होण्यासाठी (Passing Criteria): विद्यार्थ्याला दोन्ही पेपरमध्ये प्रत्येक पेपरमध्ये किमान ४०% गुण मिळवणे आवश्यक आहे. (म्हणजे पेपर १ मध्ये किमान ६० गुण व पेपर २ मध्ये किमान ६० गुण = एकूण १२० गुण).

  • गुणवत्ता यादी (Merit List):

    • राज्यपातळीवर Top 100 विद्यार्थ्यांची राज्य गुणवत्ता यादी जाहीर होते.

    • जिल्हापातळीवर Top 25 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर होते.

    • बार्टी (BARTI): शिष्यवृत्तीच्या कट-ऑफमध्ये न बसलेल्या परंतु उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी 'बार्टी' (पुणे) कडून शिष्यवृत्ती दिली जाते.


८. गुण समान असल्यास प्राधान्यक्रम (Ties Break Rule)

दोन विद्यार्थ्यांना समान गुण मिळाल्यास खालील क्रमाने प्राधान्य दिले जाते:

  1. पेपर २ (तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी) मधील जास्त गुण.

  2. वयाने मोठा असलेला विद्यार्थी.

  3. विद्यार्थ्याच्या इंग्रजी नावाचे पहिले अक्षर (Alphabetical order).


९. कट-ऑफ व तयारीचा सल्ला (Cut-off & Preparation Tips)

  • कट-ऑफ दरवर्षी व जिल्ह्यानुसार बदलतो (उदा. पुण्याचा कट-ऑफ ग्रामीण व शहरी भागात ९०% ते ९८% पर्यंत असतो).

  • परीक्षेमध्ये ३०% सोपे प्रश्न, ४०% मध्यम प्रश्न आणि ३०% कठीण प्रश्न असतात.

  • साधारणपणे ३०० पैकी २०० हून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता जास्त असते.


१०. MSK Class App व सवलत कूपन

  • MSK Class App वर रोजचे लाईव्ह क्लासेस, डेली व्हिडिओज आणि ३० आयएमपी मॉक टेस्ट पेपर्स उपलब्ध आहेत.

  • ॲपमधील अभ्यासक्रमाचा मूळ खर्च ₹२५०० आहे, परंतु SCHOLAR हा कूपन कोड वापरल्यास ८०% सूट मिळून कोर्स ₹२०० मध्ये उपलब्ध होतो.

#scholarsip exam#class 4#scholarship form#syllbus
Report this website